Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

दि.31: Jio ग्राहकांसाठी नवीन वर्षांपासून सर्व नेटवर्कवर कॉल मोफत असणार आहेत. यापूर्वी इतर नेटवर्कसाठी ठराविक प्लॅनवर, ठराविकच कॉल मोफत देण्यात आले होते. वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलसोबत स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या Jioनं आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात खास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स jio पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात एक सेवा सुरू करत आहे.

Jio ने 1 जानेवारीपासून पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विमामूल्य केली आहे. ज्या ग्राहकांनी जिओचं सब्स्क्रिप्शन घेतलं आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जिओने IUC पूर्णपणे बंद केला असून आता 1 जानेवारीपासून विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे.

IUC म्हणजे interconnect usage charges म्हणजेच जिओ ते इतर नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी आकारण्यात आलेले पैसे होय. आधी जिओ यासाठी 14 पैसे आकारत होता तर नंतर 7 पैसे आकारले जात होते. आता हा चार्ज हटवण्यात आला असून विनाशुल्क कॉलिंग 1 जानेवारीपासून करता येणार आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही मोठी बातमी दिली आहे.

रिलायन्स जिओने गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की पूर्णपणे जिओ ते जिओ याशिवाय इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट कॉल विनाशुल्क करता येणार आहेत. IUC शुल्क संपल्यानंतर जिओ ते जिओ आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी देखील ऑफनेट (डोमेस्टिक वॉइस) कॉल मोफत करता येणार आहेत. 1 जानेवारी 2021 पासून सर्व कॉल पुन्हा विनामूल्य केले जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *