दे दणादण | एक्साईजचे ऑपरेशन ; हातभट्ट्यांवरील धाडीत लाखोंचा मुद्देमाल ताब्यात

0
61

MH13 News Network

हातभट्ट्यांवरील धाडीत 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर परिसरात हातभट्टी दारु भट्ट्यांवर छापे टाकुन केलेल्या कारवाईमध्ये हातभट्टी दारु निर्मितीकरीता लागणारे गुळमिश्रीत रसायन व इतर साहित्य जप्त करुन रु.3,03,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने 24 मार्च रोजी सकाळच्या सत्रात मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील हद्दीत अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर धाडी टाकून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये 7 गुन्हे नोंदविले. या कारवाईत बारा हजार नऊशे लिटर रसायन, लोखंडी भट्टी बॅरल, प्लॅस्टिक बॅरल इत्यादी साहित्य असा एकुण रु. 3 लाख तीन हजार सहाशे इतक्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप अधीक्षक सदानंद मस्करे, निरीक्षक अ विभाग संभाजी फ़डतरे, निरीक्षक भरारी पथक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सिमा तपासणी नाका नांदणी हजारे, दुय्यम निरीक्षक ब-1 विभाग उषाकिरण मिसाळ , सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जवान इस्माईल गोडिकट, वसंत राठोड, योगिराज तोग्गी, अनिल पांढरे, वाहन चालक रशीद शेख व मारुती जडगे यांनी पार पाडली.

आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.