जागतिक कला दिन व विश्व हास्य कलाकार चॉर्ली चॉप्लीन यांची १३५ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

0
37

Big9 News

सोलापूर  विश्व हास्य कलाकार चॉर्ली चॉप्लिन स्पेन्सर चॉप्लीन यांचा जन्म १६ एप्रिल १९८९ रोजी झाला होता. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पुर्ण विश्व युध्दमय असताना एक अवलिया चॉर्ली सर्व विश्वाला हसवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांच्या त्या अदाकारी पुर्ण विश्वाला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडत होत्या.

त्याच कलाकाराची आज १३५ वी जयंती असून त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आपल्या सोलापूर चार्ली चॉप्लिनची भूमिका करणाऱ्या ज्युनिअर चॉर्ली मी नकलाकार अंबादास विनायक कनकट्टी १२ तास १२ मिनिट १२ सेकंद सेवा करणार असून सदर कार्यक्रम दि. १५ रोजी दुपारी १२ पासून सुरू करून दि. १६ एप्रिल २०२३ रोजी १२ वाजता पुर्ण होणार आहे. यामध्ये विविध पक्षांचे प्राण्यांचे हुबेहुब आवाज सादर करणार असून सदर कार्यक्रम शाळा, कॉलेज, विडी कामगार परिसरात तसेच संगमेश्वर कला महाविद्यालयात सादर करणार आहे. I

सदर कार्यक्रम आपल्या परिसरात, कॉलेज किंवा ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी करण्यासाठी मी तत्पर हजर होणार आहे. त्याकरिता माझा संपर्क क्र.९८६०४४६६२० या क्रमांकावर संपर्क साधून मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन मी या पत्रकार परिषदेत करीत आहे.