आयुक्तांचा action 4 | मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुलला लागली एमपीडीए

0
271

सराईत गुन्हेगार महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सतार शेख यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द.

सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख वय ५४ वर्षे रा. केशव स्मृती झोपडपट्टी, रेल्वे लाईन, सोलापूर सध्या रा. नई जिंदगी, ज्योती किराणा दुकानाच्या पाठीमागे, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये दि. १८/०५/२०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची सहावी व या वर्षातील चौथी कार्यवाही आहे.

महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेस अब्दुल सत्तार शेख हा मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरीकांविरुद्ध गुन्हेगारी दर्शन केले आहे. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशतव भिती घालून केशवस्मृति झोपडपट्टी, रेल्वे लाईन, फॉरेस्ट, चांदणी चौक, स्टेशन भाजी मंडई, मोदी, सातरस्ता, जुना एम्प्लॉयमेंन्ट चौक, वाडीया हॉस्पीटल जवळ या परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. या परिसरात पातक शस्त्रानिशी फिरून जिवघेण्या पालक शस्त्रानिशी फिरून हल्ला करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, दगडफेक करणे, बेकायदेशिर दुकान/घरजागा बळकाविणे, घराविषयी आगळीक करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याने परिसरात दहशत व भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतःस धोकादायक इराम म्हणून सिद्ध केले आहे.

महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याचे विरुध्द शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यास १०

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २००८

मध्ये क ११० (ई) (ग) फौ.प्र. सं अधिनियमानुसार सन २०१७ मध्ये क.०३ एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात घातक शस्त्राद्वारे गंभीर दुखापत पोचुन खंडणी मागण्यासारखा गंभीर दुखापत पोचुन गंभीर स्वरूपाचा स्वरुपाचा गुन्हा केला आहे.

महमद हनिफ ऊर्फ मुन्ना ऊर्फ वॉन्टेड अब्दुल सत्तार शेख यांचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यारा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थान आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त श्री. हरीश बैजल सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची सहावी व या वर्षातील चौथी कार्यवाही आहे.

मा. पोलीस आयुक्त हरीश वैजल यांचे आदेशाप्रमाणे मा. बापू मांगर पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) यांचे नियोजन व

मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रिती टिपरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संजय साळुंखे, मोउपनि/ विशेंद्रसिंग यायसव विशेषतः एमपीडीए पथकातील अंमलदार मोना-/८३३ विनायक संगमवार, पोना / १२५४ सुदीप शिंदे, मोशि/ १९१६ अक्षय जाधव, मौशि/ १७१४ पांडुरंग धानुरे, पोशि/६५४ विशाल नवले यांनी व बपोनि श्रीमती. अश्विनी भोसले यांचे सहकार्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे.

शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हदीतील अवैध व्यवसाय करणारे सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आलीय.त्यानुसार त्यांच्यावर अशी कारवाई चालूच राहील असा इशारा पोलीस आयुक्त यांनी दिलाय.