Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

रस्ता सुरक्षा चित्रकला स्पर्धेत 1500 विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर,(प्रतिनिधी):- शालेय जीवनापासूनच वाहतुकीच्या नियम पालन करण्याची सवय लागल्यास वाहतुकीला शिस्त लागून रस्ते अपघात होणार नाहीत असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉ.दिपाली धाटे यांनी केले. रोटरी क्लब सोलापूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेतली होती त्याचे बक्षिस वितरण मेसानिक हॉल येथे झाले त्यावेळी डॉ. धाटे बोलत होत्या. यावेळी रोटरी क्लब  सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल, सचिव कौशिक शहा,माजी उपप्रांतपाल झुबीन अमारिया आदी मान्यंवर उपस्थित होते.

जगात एखाद्या युध्दात जेवढे मृत्यू होत नाहीत त्यापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातामध्ये दरवर्षी होतात. मानवी जीवन अमूल्य आहे. तो वाचला पाहिजे. परंतु मानवाच्या चुकीनेच अपघात होतात. त्यासाठीच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. नव्या पिढीच्या हाती देशाचे भविष्य असताना त्यांनी वाहतुकीचे नियम पालन केले पाहिजे. शालेय जीवनापासूनच वाहतुकेचे नियम पालन केल्यास वाहतुकीला शिस्त तर लागेलच त्याचबरोबर आपला आणि इतरांचाही जीव वाचणार आहे असेही पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी वाहतुकीचे अनेक नियम उपस्थित मुलांना सांगून मार्गदर्शन केले.

प्रारंभी रोटरी क्लबचे सचिव कौशिक शहा यांनी या रस्ता सुरक्षा चित्रकला स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली. त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातून रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल यांनी या चित्रकला स्पर्धेच्या आयोजनामधून वाहतुकीच्या नियमांची जनजागृती होणार आहे. मुलांना वाहतुकीचे सिग्नल, शिस्त, सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियम याबाबत माहिती होणार आहे. या चित्रकला स्पर्धेत मुलांना रस्ता सुरक्षा हा विषय देवून चित्र काढण्यास सांगितले होते त्यामध्ये सहभागी झालेल्या मुलांनी चांगल्या पध्दतीने वाहतुकीच्या नियमांचे चित्र काढले आहे. असेही पटेल यांनी सांगितले.

सोलापूर शहर परिसरातील जवळपास 23 शाळांमधील 1 हजार 500 विद्याथ्यार्ंंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. इयत्ता 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा पार पाडली. प्रत्येक शाळेतून दोन गटातील प्रथम,द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षिस,भेटवस्तु आणि प्रमाणपत्र देवून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनाही स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सर्व पदाधिकारी, युथ सर्व्हिस डायरे्नटर गोवर्धन चाटला, रोटे पराग कुलकर्णी, सुनिल माहेश्वरी, डॉ. ज्योती चिडगुपकर, मितेश पंचमिया, निलेश पटेल, निकिता पटेल, मासाई चाटला, शांता येळंबकर, प्रशांत नुले, विद्या मणुरे, आदी मान्यवरांसह सहभागी विद्यार्थी विद्यार्थ्यांनीचे पालकही मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *