‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..

0
145
  • भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण

मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही
हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून गेली वीस वर्षे अभिनेते भरत जाधव हे या नाटकात पंचरंगी भूमिका करत आहेत.


वीस वर्षापासून चालू असलेले नाटक आजही प्रेक्षकांना तेवढेच टवटवीत आणि उत्साहवर्धक वाटते याचे कारण म्हणजे या नाटकाची गती आहे. हे नाटक अतिशय गतिमान पद्धतीने रंगमंचावर सादर होत असल्यामुळे ते प्रेक्षकांना भावते असे मत अभिनेते भरत जाधव यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.


या नाटकाचा 26 ऑगस्ट रोजी 4208 प्रयोग सादर होणार आहे.
त्यानिमित्ताने भरत जाधव सोलापुरात आले आहेत.
या नाटकाला वीस वर्षे पूर्ण होऊन 21 व्या वर्षात या नाटकाने पदार्पण केले म्हणून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे केक कापून आनंदोत्सव करण्यात आला.
याप्रसंगी याच नाटकात त्यांच्यासोबत वीस वर्षे काम करणारे अभिनेते जयराज नायर हे ही उपस्थित होते.
नाट्यवस्थापन संघाचे जयप्रकाश जातेगावकर.गुरु वठारे.नंदकुमार आहुजा आणि प्रशांत बडवे हे उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाचे संगमेश जेउरे यांनी प्रास्ताविक केले तर संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी भरत जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते