Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 

सोलापूर –राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आले.सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचनेस मा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी मंजुरी दिली असून त्याच अनुषंगाने 01फेब्रुवारी 2022 रोजी त्यावरती नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात करीता प्रसिद्धी देण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने असल्याने व उर्वरित 5 अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. सदरचे प्राप्त एकूण 108 अर्जावर माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या या सर्वांचे हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेण्यात आले.त्यानुसार महापालिकेच्या वतीने आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आले.शहरातील 38 प्रभाग पैकी 7 प्रभागत आयोगा कडून काही प्रमाणात
बद्दल करण्यात आले आहे.

या मध्ये 16 अनुसूचित जाती व दोन अनुसूचित जमाती राखीव ठेवण्यात आले आहे. बद्दल झालेल्या प्रभाग 10 11,12,13,21,23 व 24 या प्रभागत काही प्रमाणात बद्दल करण्यात आले आहे.अनुसूचित जाती साठी प्रभाग1,5,7,8,9,10,21,22,23,24,26,27,28,33,36 व 38 आणि अनुसूचित जमाती साठी प्रभाग 24 व 35 साठी राखीव करण्यात आले आहे.अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *