‘त्या’ मेसेजची काय आहे सत्यता ; दुकाने सात ते 7 की रात्री आठपर्यंत.!

0
537

महेश हणमे  9890440480

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशाचा अर्थ लावून सोलापूर शहरातील व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला.त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांच्याशी MH13 न्यूज प्रतिनिधीने संवाद साधला असता एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली.

मुद्दा क्रमांक 6 काय सांगतोय..!
सोलापूर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने अत्यावश्यक वस्तू व सेवा जसे की मेडिकल दुकाने वगळून हॉटेल,रेस्टॉरंट,बार, फूड कोर्ट, सिनेमागृहे,नाट्यगृह,प्रेशागृह इत्यादी आस्थापना रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत बंद राहतील. तथापि हॉटेल मार्फत पार्सल सेवा घरपोच सेवा सुरू राहील.या नियमांचा भंग झाल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील, तसेच आस्थापनांच्या मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
हा आदेश 28 मार्च रोजी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे.

25 मार्च रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार सोलापूर शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीत चालू राहतील. तथापि अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रा साठी जीवनावश्यक वस्तू,भाजीपाला, फळे,किराणा व दूध व वृत्तपत्र वितरण याबाबत हा आदेश लागू राहणार नाही. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील .शहरातील दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या कालावधीतच सुरू राहतील.

सोशल मिडीयावर वेगाने पसरणारा हाच तो मेसेज..

नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या सर्व व्यापाऱ्यांना कळवण्यात येते की,दिनांक २८/०३/२०२१ रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. पी. शिवशंकर साहेब यांनी नवीन आदेश काढला आहे त्या आदेशानुसार  सोलापूरातील सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवा जसे मेडिकल वगळून सर्व Non Essential Commodities बिगर अत्यावश्यक दुकाने ही रात्री ८.०० पर्यंत सुरू राहणार आहेत.
तरी सदर बदलाची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी.

टीप :- सोबत २८/०३/२०२१ च्या आदेशाची PDF पाठवत आहे त्यात ६ नंबर पॉईंट बघावे.

कळावे,
नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर
अध्यक्ष, अशोक मुळीक

दिनांक.29/3/2021
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकलचर
९३०,सिध्देश्वर कापड मार्केट चाटी गली सोलापूर
अध्यक्ष राजू राठी
सचिव धवल शहा
महत्वाचे बदल व सुचना मा. श्री. पी. शिवशंकर,आयुक्त,सोलापूर महानगरपालिका,
सोलापूर यांच्या आदेशानुसार सोलापूरातील सर्व non essential commodities बिगर अत्यावश्यक दुकाने ही रात्री.8 पर्यंत सुरू राहणार आहे तरी सदर बदल प्रमाणे दुकान 7 वाजता न बंद करता 8 वाजता बंद करावा.

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स
अध्यक्ष राजू राठी
सचिव धवल शहा

राज्य सरकारने २८ मार्च रोजी आदेश लागू केले आहेत.त्यानुसार रात्री आठपर्यंत दुकाने सुरू राहतील.जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्तांशी चर्चा करून थोड्याच वेळात महापालिका क्षेत्रासाठी सुधारित आदेश जाहीर करण्यात येईल.

महापालिका आयुक्त पी.शिवशंकर