Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ व आमदार विजयकुमार देशमुख,भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत नगरसेविका ज्योती बमगोंडे यांनी बहुजन समाज पार्टी मधून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टी ने नारीशक्ती मेळावा घेतला होता त्याचे औचित्य साधून बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविका बमगोंडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काही महिन्यांपासून त्यांच्या प्रभागातील विकासकामांमध्ये भाजपच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची दिसणारी उपस्थिती त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे  स्पष्ट करत होत्या.

बहुजन समाज पक्षाचे नंतर वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरातील प्रमुख नेते असणारे आनंद चंदनशिवे यांच्या गटातील याआधी स्वाती आवळे आणि आता  ज्योती बमगोंडे या दोन्ही नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केलाय.

भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य आहे.महिला वर्गाच्या प्रगतीसाठी,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा पर्याय भाजपात उपलब्ध होता. त्यामुळे महिला वर्गांच्या प्रगतीसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला आहे.

 ज्योती बमगोंडे, नगरसेविका 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *