Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मी मोबाईल बोलतोय..!

नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो,

मी मोबाईल बोलतोय…! होय, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, मनातलं काही सांगायचं आहे. तुमच्याशी संवाद साधायचं आहे.

माझा शोध लागला, मी पृथ्वीवर आलो आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तुम्हाला आठवत असतील टेलिग्राम आणि टेलिफोनचे ते दिवस ! या नंतर सुरुवात झाली ‘पेजर’ च्या दुनियेला आणि नंतर मी… मोबाईल ! माझ्यामुळे तुमच्या जीवनात सुलभता आली, नवे तंत्रज्ञान आले… आणि अवघे जग तुमच्या मुठीत आल्याचा भास तुम्हाला झाला, याचं मला मोठं समाधान आहे, आनंद आहे. वास्तविक पाहता माझे म्हणजे मोबाईलचे तुम्हाला झालेले फायदे हे काही याठिकाणी पुन्हा सांगण्याची गरज नाही, या गोष्टी सर्वश्रुत आहेत.

आज जवळपास प्रत्येकाच्या हाती ‘मी’ आहे. मला आठवतात ते दिवस…. आधी मी बॅगेत असायचो… नंतर खिशात आलो… म्हणजे गरज असेल तेंव्हाच तुम्हाला माझी आठवण यायची परंतू… आता मात्र मी प्रत्येकाच्या ‘हातात’च असतो. केवळ हातात नाही तर तुमची नजरसुद्धा नेहमी माझ्याकडेच असते. हे सगळं पाहून मला खूप भारी वाटत होतं आणि आताही वाटतंच. पण खरं सांगू…? अधूनमधून खूपच भीती वाटतेय. कधी कधी मी अगदी अस्वस्थ होऊन जातो. मी मानवाच्या जीवनात आलो आणि त्यांच्या गळ्यातला ताईत बनलो…. खरंच मी तुमच्या गळ्यातला ताईत बनतोय का ? … या प्रश्नाने माझा जीव कासावीस होऊन जातो. आपण एखाद्याच्या जीवनात इतकं खोलवर रुतून जाणं मुळात मला पटतच नाही. म्हणून तुमच्याशी बोलण्याचा हा प्रपंच !

बाजारात उपलब्ध असलेली माझी नानाविध रुपे आणि माझ्यामध्ये सामावलेले आधुनिक तंत्रज्ञान नेहमीच तुम्हाला खुणावत असतात. मी माझ्या असंख्य रंगात आणि ढंगात प्रत्येकाकडे असतो. आता अलीकडे तर माझ्यातला ‘स्मार्ट’पणा आणखीनच वाढलेला आहे. तुमच्या एकूण दैनंदिनीची पूर्णतः जबाबदारी जवळपास माझ्याच खांद्यावर आहे. तुम्हाला सकाळी उठवण्यापासून रात्री झोपवेपर्यंत मला अखंड कार्यरत राहावं लागतं. माफ करा, उठवणं माझ्या हातात आहे परंतू तुम्हाला झोपवणं मात्र अजून माझ्याकडे काम आलेलं नाही, होय ना ! असो.

वैद्यकीय शास्त्रानुसार ठराविक वेळेपेक्षा जास्त माझा वापर केला तर डोळ्यावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. यासोबतच मानेवर आणि हातावर ताण येतो. एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्यानंतरचे दुष्परिणाम तर वेगळेच. वास्तविक पाहता या साऱ्या गोष्टी आपल्याला माहित आहेतच. तरीसुद्धा ….!

अनेक ठिकाणी घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मला सोबत घेऊनच केलं जातंय. समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना वाक्यागणिक माझ्याकडे पाहत असल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. आपल्याशी एखादी मोठी किंवा वडीलधारे व्यक्तिमत्व बोलत असताना माझी रिंग वाजली की अनेकांना समोर कोण आहे याचं भान रहात नाही…. भरधाव वेगाने मोटारसायकलवरून जाताना, ड्रायव्हिंग करताना देखील माझा वापर केला जातोय, या गोष्टी खऱ्या आहेत का हे आपणच तपासून पाहायचंय…!

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हातात आता मी आलोय. कोविड सारख्या संकटसमयी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. लहान मुला-मुलींना; माझा अनाठायी वापर करू नये, असं सांगणारी सक्षम अशी घरातली मोठी मंडळी असल्यामुळे मला यांची मुळीच काळजी नाही. परंतु या मोठ्या मंडळींना कोण सांगणार, हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. घरी… बाहेर… धार्मिक स्थळी… कार्यालयात… म्हणजे जवळपास प्रत्येक ठिकाणी ‘मी’ तुमच्या हातात असतो…! या बद्दल आपलं मत काय आहे ? सगळीच मंडळी असं करतात असं माझं अजिबात म्हणणं नाही, परंतू हे अलीकडे वाढतं आहे, हे मात्र नक्की.
मोठ्या मंडळींना आणि आजच्या तरुणाईला मला एवढंच सांगायचं आहे…. जो वेळ आपण ‘मला’ पाहण्यात, वाचण्यात घालवताय, यातून काहीतरी चांगल्या विधायक गोष्टी पदरात पडतायत का?…. यातून स्वतःच्या, समाजाच्या, देशाच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी काही घडतंय का?…. जो वेळ आपण दवडतोय तो सत्कारणी लागतोय का?…. असे प्रश्न मात्र स्वतःला नक्की विचारून पहा.

मी समजू शकतो… विरुंगळ्याचे काही क्षण, हलकेफुलके विनोद, ताज्या बातम्या, काही घटना वैगेरे गोष्टी पाहता येतील…परंतू तुमच्या जवळ जितका उपलब्ध वेळ आहे, तो सगळा ‘मला’ पाहण्यात घालवणार असाल तर कसं होणार ? आधुनिक तंत्रज्ञान हे तुमचं जीवन सुलभ होण्यासाठी आहे, त्यामुळे याच्या आहारी न जाता त्याचा सुयोग्य वापर करणे महत्वाचे आहे.

आज प्रत्येकाकडे ज्याची कमतरता आहे ती गोष्ट म्हणजे वेळ ! वेळेचा सदुपयोग करणे ही आजची गरज आहे. माझ्यामुळे तुमचा अमूल्य वेळ वाया जाणार असेल तर मला ते अजिबात आवडणार नाही. आपली प्रत्येक कृती ही राष्ट्र बांधणीसाठी असायला हवी, असं अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे, याचं भान असणं गरजेचं..!

मोबाईल
९८८१५५०२००

#अरविंदलेख

आज प्रत्येकाकडे ज्याची कमतरता आहे ती गोष्ट म्हणजे वेळ ! वेळेचा सदुपयोग करणे ही आजची गरज आहे. माझ्यामुळे तुमचा अमूल्य वेळ वाया जाणार असेल तर मला ते अजिबात आवडणार नाही. आपली प्रत्येक कृती ही राष्ट्र बांधणीसाठी असायला हवी, असं अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे, याचं भान असणं गरजेचं आहे.

बाकी तुम्ही जाणकार आहेत. मी मांडलेल्या विषयावर जरूर विचार करा…. !

  • मोबाईल
    ९८८१५५०२००
  • #अरविंदलेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *