Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’द्वारे हिंदूंची एकमुखी मागणी !

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेबसिरीजवर बंदी घाला !

सोलापूरात 3 मार्चपासून झी-5 (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्या ‘ताज: डिव्हाइेडड बाय ब्लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूर अकबर आणि त्याच्या परिवाराचे अर्थात मोगलांचे उदात्तिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिनांक 15 मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे जिल्हापरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे, श्री. नितीश जावळकोटी, धर्मप्रेमी श्री. आनंद कोंडा, श्री. राहुल वडनाल, अधिवक्ता अर्चना बोगम यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, तसेच श्री. दत्तात्रय पिसे, श्री. विपुल भोपळे, सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे, धर्मप्रेमी सर्वश्री यश मुगड्याल, श्रीनिवास श्रीगांधी, मल्लेश मारा, श्रीकांत बिंगी, श्रीकांत मुटकिरी, जयेश चिन्नी, ओंकार म्हंकाळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिल्लीवर राज्य करणारा अखेरचा हिंदु राजा विक्रमादित्य हेमू हा युद्धात बेशुद्धावस्थेत असतांना अवघ्या 14 वर्षाच्या अकबराने त्याचा शिरच्छेद करत त्याच्या क्रौर्याचा परिचय करून दिला होता. ज्या अकबराने हजारो हिंदूंचे शिरच्छेद करत त्यांच्या मस्तकांचे मिनार बनवले; ज्यांच्या काळात शेकडो मंदिरे उध्वस्त केली; हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले गेले; हिंदु स्त्रियांवर अत्याचार करत त्यांना भर बाजारात विकण्यात आले; ज्या मोगलांनी भारतभूमीतून हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशा मोगल अकबराला ‘सहिष्णू’, ‘सर्वधर्मसमभावी’, ‘आध्यात्मिक’ आदी विशेषणे लावून त्याचा खोटा इतिहास प्रचारित केला जात आहे. अशा क्रूरकर्मा मोगलांचे उदात्तीकरण करणारी वेबसिरीज बनवणे, म्हणजे हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.

याच वेबसिरीजमध्ये अकबराची भूमिका साकारणारे अभिनेता नसरूद्दीन शाह यांनी ‘मोगलांनीही चांगले काम केले आहे. ते भारतात आक्रमण करायला नव्हे, तर बस्तान बसवायला आले होते. मोगल जर एवढे क्रूर असतील, तर त्यांनी बांधलेला ताजमहाल आणि लाल किल्ला पाडून टाका’, असे हिंदूंना डिवचणारे वक्तव्य करून मोगलांच्या क्रूरतेला पाठीशी घालून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही त्यांनी हिंदूंना डिवचणारी अनेक वक्तव्ये करत हिंदु-मुसलमान यांच्यात जातीय दुही निर्माण केली आहे.

त्यामुळे  नसरूद्दीन शाह यांच्यासारख्या मोगलप्रेमी कलाकारांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *