Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

      तळागाळातील लाभार्थीना महिला व बालविकास सेवा योजनेचा लाभ द्या- उपायुक्त संजय माने

सोलापूर तळागाळातील लाभार्थीना महिला व बालविकास सेवा योजनेचा लाभ द्या असे आवाहन महिला व बालविकास पुणे विभागाचे उपायुक्त संजय माने यांनी केले. आज सोलापूर जिल्ह्यास भेट देऊन महिला व बालविकास मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव , वर्षा पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी , संरक्षण अधिकारी , अधीक्षक महिला व बालगृहे तसेच नागरी प्रकल्पातील सर्व मुख्य सेविका उपस्थित होते.

सर्व प्रथम जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी सोलापूर जिल्हयात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध नाविण्यपूर्ण योजनांबाबत उपायुक्त संजय माने यांना सविस्तर माहिती दिली. माझे मूल माझी जबाबदारी , अमृतमहोत्सवाची बालसंजीवनी , दशसुत्री इत्यादी अभियानाचे यावेळी श्री संजय माने यांनी कौतूक केले व सर्व पूणे विभागामध्ये यासारख्या योजना राबविणेबाबत सूचना देणार असलेचे जाहीर केले.
उपायुक्त संजय माने हे दोन दिवस सोलापूर जिल्हयाच्या दौऱ्यावर असून काल मोहोळ प्रकल्पातील मौजे कुरुल येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिली असता अंगणवाडी केंद्राची भौतिक सुविधा व पूर्व शालेय शिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हयातील इतर अंगणवाडी केंद्रांनाही अशाच प्रकारच्या सुविधा व पूर्व प्राथमिक शिक्षण देणेबाबत सूचना केली.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपायुक्त श्री संजय माने यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना व महिला बालविकास विभागाकडील योजनांचा संयुक्तपणे आढावा घेताना बालगृहे , अनाथालय यांचे माध्यमातून जास्तीत जास्त अनाथ , अत्याचार ग्रस्त महिला यांना सुरक्षित निवारा मिळणेसाठी त्यांना महिला गृहात दाखल करणेबाबत सूचना दिल्या.

संरक्षण अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा घेताना मिशन वात्सल्य अंतर्गत विविध सेवांचा लाभ देताना लाभार्थी आपल्यापर्यंत येण्याची वाट न पाहता आपण स्वतः लाभार्थी पर्यंत पोहोचावे अशा सूचना श्री माने यांनी यावेळी दिल्या.

ग्रामीण प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा बालआधार नोंदणी , पोषण ट्रॅकरमध्ये बालकांच्या वजनाची नोंदणी , माझी कन्या भाग्यश्री , सिंगल नोडल खाते तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सुरु असणारी भरती याबाबत सविस्तर आढावा घेतला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची भरती सुरु असून सदर भरती पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने करणेबाबत‍ उपायुक्त संजय माने यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिल्या.
अंगणवाडीच्या सेवा व उदिदष्टे हे सर्व अंगणवाडी सेविका , पर्यवेक्षिका , बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तोंडपाठ असले पाहिजेत तसेच गृहभेटीव्दारे जास्तीत जास्त लोकवर्गणी जमा करून अंगणवाडी केंद्राच्या भौतिक सुविधा , दर्जा उंचावताना लोकांना अंगणवाडी ही आपली अंगणवाडी वाटली पाहिजे असे कामकाज करणेबाबत श्री संजय माने यांनी आवाहन केले.
महिला व बालविकास विभागामध्ये काम करणे म्हणजे एक लोकहिताचे काम करत असलेची भावना मनात ठेवून योजनांचा लाभ देणे हे केवळ काम म्हणून न करता सेवाभावी उददेश डोळयासमोर ठेवून योजना राबविणेबाबत उपायुक्त श्री संजय माने यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी , संरक्षण अधिकारी यांना आवाहन केले.
आढावा सभेस जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख , बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव , वर्षा पाटील , सुवर्णा जाधव , रेशमा पठाण , आनंद जाधव , बालाजी आलडवाड , जगन्नाथ गारुळे , समाधान नागणे , अमृत सरडे , आसमा आत्तार , किरण सूर्यवंशी तसेच जिल्हा परिषद कक्ष अधिकारी चंद्रकांत होळकर व विस्तार अधिकारी श्रीकांत मेहेरकर इत्यादी उपस्थित होते. बैठक यशस्वी करणेसाठी अर्चना निंबाळकर ,कलादगी व सौ अमिता वसेकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *