Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9 News

सोलापूर महानगरपालिकातर्फे प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (pmsvanidhi) अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचा सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (pmsvanidhi) योजनेची अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिका nulm विभाग शहर अभियान कक्षाद्वारे युद्धपातळीवर सुरु असून शहरातील एकूण ८७४५ पथविक्रेत्यांनी १० कोटी तीस लक्ष रुपयाचे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँकामार्फत करण्यात आलेले आहे. सदर योजनेसाठी २०००० पथ विक्रेत्यांनी online पद्धतीने अर्ज केलेले होते,१०००० रुपये नियमित परतफेड करणाऱ्या १४०० लाभार्थ्याना २०००० हजार रु कर्जाचा तर २०००० रु नियमित परतफेड करणाऱ्या ५० लाभार्थ्यांना ५०००० हजार रुपयाचे कर्ज प्राप्त झाले आहे.

तसेच या सर्व लाभार्थ्यांना “मै भी digital” अभियान अंतर्गत online व्यवहार करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण प्राप्त ६ हजार पथविक्रेते digital व्यवहार करून कॅशback चा ही नियमित लाभ घेत आहेत.covide-१९ च्या पार्श्वभूमीवर महामारीने त्रस्त घटकामध्ये रोजी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यानसाठी सदर योजना ही आर्थिक संजीवनी देण्याचे कार्य करीत आहे.

अत्यंत कमी कालावधीमध्ये शिफारस पत्र देवून online अर्जाचे जलदगतीने उदिष्ट पूर्ण करून कर्जाचा लाभ मिळवून देण्यामध्ये  आयुक्त, उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी NULM विभागातील शहर अभियान व्यवस्थापक,समुदाय संघटक,अग्रणी बँक व्यवस्थापक,सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्तिक अथक प्रयत्नामुळे सोलापूर महानगरपालिका ही १० लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेमध्ये सोलापूर शहर महानगरपालिका हे प्रथम क्रमांकावर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *