रोमांच हर्ष… चित्तथरारक. लाठीकाठी… युद्ध कला मोफत प्रशिक्षण शिबिराची समारोप सांगता…

0
143

Big News

सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 14 मे ते 17 मे 2023 रोजी होम मैदान येथे मोफत लाठीकाठी युद्ध कला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते, यामध्ये 75 शिबिरार्थीने सहभाग नोंदविला.

आधी जिजाऊ घडली, तर अनेक शिवबा घडतील. अशा विचारांची आदर्श मनात बाळगून माताभगिनीं मोठ्या उत्साहाने सहभागी होत्या . दिनांक 17 मे रोजी या शिबिराचे समारोप सांगता खूप उत्साहात पार पडली.शिबिरार्थींना सहभागी प्रमाणपत्र देत.तसेच चित्त थरारक शिवकालीन युद्ध कला तसेच लाठीकाठी युद्ध कला सादर करत करण्यात आले. आपली संस्कृती आपण कशी जपली पाहिजे.

शिवकालीन काळात युद्ध कला म्हणून लाठीकाठी या कलेचा स्वसंरक्षणासाठी शस्त्र म्हणून वापर केला जात असे. आज ही कला प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. प्रत्येक मुलींना मुली वाचवा हा निरोप मुली वाचवा हा हा संदेश किंवा प्रसार करण्यापेक्षा, आज काळाची गरज आहे कि स्वावलंबी होण्याची, एक मुलगी दहा मुलांपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकते. याची प्रशिक्षणही या शिबिरात देण्यात आले.

हे प्रशिक्षण लहानांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत ठेवण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय उत्साहाने या शिबिरात प्रत्येकाने भाग घेतला.
प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सांगता वेळेस प्रशिक्षणार्थी बालचमुनी आपली कला सादर केली. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी चे स्वसंरक्षणाची अनेक प्रकार मुलांनी सादर केले.प्रशिक्षक अश्विन कडलासकर लाठी इंडिया ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष शिवराम भोसले.यांनी प्रशिक्षणार्थींना मनोबल, आत्मबल, धैर्य,शौर्य स्वसंरक्षण यांचे धडे दिले.

 

यावेळी पोलीस सहाय्यक उपायुक्त दीपक आरवे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोलापूर शहर जिल्हा लाठी असोशियनचे उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य संजय साळुंखे, लाठी इंडिया ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष शिवराम भोसले, सामाजिक कार्यकर्ते धीरज छापेकर, सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनचे जिल्हा सचिव तथा एशियन निर्णायक पंच व प्रशिक्षक अश्विन कडलासकर. महिला प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय लाठी निर्णायक पंच सौ अंजना कडलासकर. हे उपस्थित होते.

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी सहप्रशिक्षक म्हणून. प्रतोश आळंद, छत्रवीर पवार,तनवी पवार,यशराज धावारे, रजनी खानापुरे,राहुल भोसले,रोहित भोसले यांनी काम पाहिले या प्रशिक्षण शिबिरात समारोप प्रसंगी, कार्यक्रमात विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.