‘त्या’ लाचप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला…

0
97

सोलापूर येथील विद्युत विभागातील सहाय्यक विद्युत निरीक्षक फैजुलअली मेहबूब मुल्ला यांनी तक्रारदार यांच्याकडे विद्युत ठेकेदार परवाना मिळण्यासाठी रक्कम रुपये बत्तीस हजार लाच मागितली असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. तक्रारदार व आरोपी मुल्ला यांच्या लाचेच्या रक्कमे संदर्भात बोलणी होऊन लाचेच्या रकमे पैकी सुरुवातीस रक्कम रुपये 15000/- लाच देण्याचे ठरले. त्यानंतर सदर लाचेची रक्कम ही आरोपीने स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


सदर प्रकरणात सोलापूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पांढरे आर. एन. यांनी आरोपी फैजुलअली मुल्ला यांची रक्कम रुपये पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपी मुल्ला यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. नितीन स्वामी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजूल यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.