माढा नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागेसाठी 80 टक्के मतदान

0
757

Big9news Network

  • 2633 पैकी 2112 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

शेखर म्हेत्रे माढा प्रतिनिधी: माढा नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागेसाठी आज मतदान झाले.या 4 ही जागेसाठी निवडणूक चुरशीची झाली असली तरी मतदान शांततेत पार पडले .उद्या 19 जानेवारी बुधवारी सकाळी 10 वा. निकाल लागणार आहे. आहे. या साठी प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून एकूण मतमोजणीच्या चार फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत प्रभाग 1 ते 5 दुसऱ्या फेरीत सहा ते दहा तिसऱ्या फेरीत 11 ते 15 चौथ्या फेरीत 16 व 17 प्रभागाची मतमोजणी होणार आहे.

या मतमोजणीसाठी प्रत्येक फेरी वेळेस ज्या त्या प्रभागातील मतमोजणी प्रतिनिधीनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी कोणालाही आपला मोबाईल फोन घेऊन प्रवेश दिला जाणार नसल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले त्याच बरोबर विजयी मिरवणूकीसाठी परवानगी दिली जाणार नाही. त्याच बरोबर मतमोजणीच्या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथकही असणार आहे कोविड चे सर्व नियम पाळून ही मतमोजणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पोलीस प्रशासनाकडून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी त्याला सहकार्य करण्याचे आवाहन माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्‍याम बुवा यांनी सांगितले. मतमोजणी पुर्ण झाल्यावरच मतदान चुरशीची झाल्याने माढा नगरपंचायत मध्ये कोणाची सत्ता येणार हे उद्या स्पष्ट होणार असल्याने नागरिकांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे.

प्रभाग निहाय झालेले मतदान पुढिलप्रमाणे –

  • प्रभाग 5 – 560/463
  • प्रभाग 7 – 817/594
  • प्रभाग 9 – 624/525
  • प्रभाग 14 – 632/530