Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज काल घरगुती गॅस सिलेंडर बाबतच्या निष्काळजी पणामुळे अनेक दुःखद बातम्या वाचावयास मिळत आहेत. त्यामुळे सध्या घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याच हेतूने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने कासेगाव (ता. पंढरपूर) मध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकामध्ये प्रा.नीता कुलकर्णी यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळती संबंधी घ्यावयाची काळजी व त्याचे फायदे तोटे याबाबत प्राथमिक स्वरुपात माहिती दिली व कार्यक्रम राबविण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रा.तेजस जोशी यांनी डिजिटल डस्टबीनची माहिती दिली आणि त्याचे फायदे-तोटे सांगितले तसेच ते कसे वापरायचे याचीही माहिती देवून घ्यायची काळजी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली.

प्रा. महुवा बिश्वासप्रा. स्मिता गावडे तसेच गॅस कंपनीतील अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून गॅस पासून धोका होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सांगून सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर करून बनविलेल्या उत्पादनाच्या सहाय्याने नुकसान कसे टाळता येईल याचे प्रात्यक्षिक करून स्पष्ट केले. गॅस गळती मुळे आपल्या आरोग्यावर होणारा धोका ओळखून नवीन तंत्रज्ञानापासून बनवलेले उत्पादन वापरण्यास सर्व उपस्थितांनी प्रतिसाद दिला. सेन्सर टेक्नॉलॉजी वापरून आपले घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञानाद्वारे पाइप लिकेज ओळखणेकमी वजनाचे गॅस सिलेंडर ओळखून आपली फसवणूक होण्यापासून वाचवणे इ. बाबत मार्गदर्शन केले आणि ऑटोमॅटिक सेन्सर द्वारे संभाव्य धोका टाळण्यासाठी जनजागृती करून संपूर्ण माहिती दिली. अलीकडे गॅस गळतीमुळे अनेक धोके निर्माण होत असताना स्वेरीने केलेली ही जनजागृती महत्वाची आहेहे मात्र नक्की. यावेळी अधिकाऱ्यांनी सेन्सर टेक्नॉलॉजी असलेली मशीन दाखवून त्याची माहिती दिली व ते कसे कार्य करते हे समजावून सांगितले. या जनजागृती कार्यक्रमामुळे विशेषतः महिला वर्ग घरगुती गॅस सिलेंडर बाबत जागृत राहतील आणि गॅस सिलेंडर आणि गॅस गळतीची भविष्यात काळजी घेतील. यावेळी गॅस कंपनीचे काही अधिकारीमाजी सरपंच दाजीसाहेब देशमुख व कासेगाव ग्रामस्थ प्रा. ज्योती शिंदे व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रमेश कोळी व कासेगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *